ओळख

९. बस खराब झाली अन ....

21:57 mayur 0 Comments





college चे सुरुवातीचे दिवस होते, १ आठवडा झाला असेल जेमतेम, नवीन मित्र, नवीन सभोवतालच वातावरण, आणि नवीन ओळख

बस stop वर असायची उभी college सुटल्यावर, कधी दिसायची कधी नाही. पण त्या ४-५ दिवसात सतत दिसायची college वरून घरी जाताना, त्या दिवशी मी smile दिली , तिनेही smile दिली, इतक सहज झाल ते कि वाटलच नाही कोणी अनोळखी व्यक्ती ला मी अस smile देतोय. पंजाबी dress मध्ये चष्मा घालून, हातात सतत खेळणारा mobile, गोरा चेहरा, काळेभोर केस, दिसायला सुबक, उंचीला कमी तरी शोभून दिसायची, अस सर्व असताना त्या मुलीने माझ्या smile ला smile ने उत्तर दिल.

त्या आचार्याने मी तिच्याकडे पाहत होतो तेवड्यात बस आली, मी तिच्या आधी चढलो आणि मला माहित आहे ती “महिलांसाठी” त्याच seat वर बसणार आहे म्हणून मी त्याच्या मागच्या seat वर जाऊन बसलो. बस मध्ये जास्त गर्दी नव्हती ती कुठेही बसू शकत होती. पण ती माझ्या पुढच्याच seat वर बसली. दुसरा अशार्याचा धक्का, काही वेळाने बस सुरु झाली. तिने काही माझ्या कडे मागे वळून पाहिलं नाही पण मी मात्र मागून तिलाच पाहत होतो कारण इतक्या जवळून मी नव्हत पाहिलं तीला.

तिचा चेहरा दिसत नसला तरी तिचे नीट विंचरलेले केस, केसातला क्लीप अस काही उगाचच पाहत होतो, बस ५-६ stops  गेल्यावर अचानक थांबली, “बस खराब झाली” ,”उतरा ..उतरा ” असे आवाज माझ्या कानी येऊ लागले. ती उठली अन लग्गेच उतरली पण बस मधून, मी पण उतरलो अन तीला शोधू लागलो, बस मधले सर्व जन उतरल्यामुळे मला काही ती दिसनासी झाली, तेवड्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर २ वेळा हळूच tap केल. ती सापडत नाही अन कोणी मागून tap करतय...?

मागे वळून पाहिलं तर चक्क तीच .....३ रा धक्का

मी : (अडखळत) हेलो ..hi

ती: hi ..कोणाला शोधतोय ?

मी : (गालात हसून) तुलाच

ती : मी मागे उभी होती, मला वाटल तू मागून उतरशील

मी : तू उतरलीस न मग तुझ्या मागूनच उतरलो ..but तू ...

ती : दुसरी बस पकड मग आता

मी : तू ?

ती : नाही २ stop आहेत चालत जाईन मी

मी : चल मी पण येतो .. चालेल न ? (अस पहिल्यांदाच केल मी कोणा मुलीला विचारलं )

ती : हो चालेल पण तू कुठे राहतोस ?

(मी खूप लांब राहत होतो पण बोललो)

मी : अरे इथे माझ्या मित्राच office मध्ये भेटन त्याला

ती : चल मग

अस मग सोबत चालत होतो ... खूप मस्त बोलत होती, ऐकतच रहावस वाटत होत पण मीच  जास्त बोलत होतो माहित नाही का ??   

तिच्या कडे मी भिन्दास पाहत होतो अन तीही माझ्या कडे ..स्पष्ट बोलत होती, वाटतच नव्हत पहिल्यांदा बोलतोय,.आम्ही २-३ वेळा तरी बस मधून उतरल्यावर जे झाल त्यावर हसलो .. माहित नाही का!

गोलसर चेहरा, हसताना गुलाबी रंगाचा glow यायचा तिच्या चेहऱ्यावर, फक्त जराशी हसली तरी गालावर खळी यायची अस सगळ पाहून मी जास्तच उतावळेपण दाखवत होतो अन  बडबड करत होतो. तीही माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत होती. समजून घेत होती मी काय बोलतोय ते.
कोणी दोन मानस जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा काय बोलत असतील तेच ती बोलत होती, मी मात्र उगाच पटेली मारत होतो. तरी ती शांत आणि नेमक उत्तर देत होती. बोलताना तिच्या ओठांची हालचाल अशी काही ह्यायची कि वाटायचं कि बोलायचं दुसर अन बोलतेय दुसर, मला तर निराळच वाटत होत

ती : चल आता जा तू मी जाईन

( वाऱ्याची झुळूक येऊन लग्गेच नाहीशी होते तसा काहीसा क्षण होता माझ्यासाठी ...... लग्गेच आला तिचा stop ... असा विचार करत मी उत्तर दिले )

मी : हो bye

आणि ती समोरून निघून गेली अन मी माझ्या घरच्या परतीचा रस्ता धरला


काही धक्के चांगले वाटतात प्रेमाने दिले तर.....        

0 comments:

#romantic,

८. एक romantic संवाद

16:23 mayur 0 Comments







नेहमी प्रमाणे रात्री १० ला तिचा msg आला ...

ती : हेल्लो , जेवलास का ?

मी : हो आणि तू ?

ती: मी पण आत्ताच ... आज कंटाळा आलाय रे खूप 

मी : का ग ? काय झाल ?

ती : माहित नाही , काही तरी वेगळ बोलूया आज 

मी : वेगळ ...काही तरी खास ??

ती : हो...काही तरी खास 

आम्ही दोघ अस रोज गप्पा मारायचो रात्री , खूप गप्पा ह्यायच्या , कश्यावरही बोलायचो त्या दिवशी ती बोलली काही तरी वेगळ बोलूया आणि मी सहजच तिच्या ललग्नाबद्दल विचारलं 

मी : तुझ लग्न कधी होईल ?

ती : ३-४ वर्षात , का रे तूला घाई लागलीय का लग्नाची माझ्या ?

मी : हो! तू कर लग्न आणि सांग मला लग्ना नंतरची मज्जा 

ती : हट , अस कोणी सांगत का?? 

मी : सांगू नाही शकत , imagine तर करू शकतो ना ?

ती : मला नाही जमत अस काही imagine करायला ..तूच सांग तुला काय वाटतंय ते 

मी : हो का .... मी शिकवतो मग तुला ...समज तुझ लग्न झालाय ...लग्ना नंतरचा दुसरा दिवस आहे 

ती : मग पहिला दिवस ?

मी : पहिल्या दिवशी पाहुणे वेगेरे असतात ना 

ती : हाहाहा ... बरोबर ... २ रा दिवस पुढे 

मी : लग्नानंतर च्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून , मस्त अंघोळ वेगेरे करून , तुझ्या आवडत्या रंगाची साडी नेसून , आपल्या  पती साठी चहा घेऊन जात आहेस 

ती : हिरवा रंग ... साडीचा .. मला खूप आवडतो 

मी : हिरव्या रंगात ... नुकतीच अंघोळ केलेली ... ओले केस ....आणि बेडरूम मध्ये चाललीस चहा घेऊन 

ती : wow मस्त .. पुढे बोलत राहा 

मी : बेडरूम मध्ये  येतेस ... तुझे पतीदेव झोपलेले असतात .... समोरच्या टेबलावर चहा ठेवतेस आणि त्याला उठावण्यासाठी हाक करतेस 

ती : मी नावानेच हाक मरेन माझ्या hubby ला 

मी : हो काहीही बोल  ...तुझाच आहे तो .....

ती : हेहे हा ... पुढे सांग 

मी : हाक मारून पण ते उठत नाहीत ... मग तुझ लक्ष कपाटाच्या आरश्याकडे जात ....त्यात तुझ सुंदर आणि मोहक रूप जणू काही तुलाच पाहत असत.तू आरश्यात स्वतःला नेहाळत असतेस...

ती : कस सुचत रे तुला ? मला तर वाचूनच छान वाटायला लागलाय , अस वाटतंय खरच लग्न झालाय माझ ...बोल तू मी वाचतेय 

मी : हिरवा बांगड्यांचा चुडा , ओले मोकळे केस , हिरव्या रंगाची सुंदर साडी , गळ्यात मंगलसूत्र , कपाळावरच नुकतच लावलेलं कुंकू अस सर्व पाहण्यात तू स्वतामधेच  हरवून जातेस....

ती : किती मस्त रे .... 

मी : तू स्वतःमध्ये गुंतलेली असतेस ....आणि तेवड्यात तुझा hubby अचानक येतो आणि मागून मिठी मारतो तुला , त्या एक हाथ तुझ्या पोटावरून घरंगळत बेंबी च्या दिशेने जातो आणि दुसऱ्या हाताने तुझा एक हाथ घट्ट पकडून ठेवतो 

ती : अंगावर काटा आला माझ्या ... खूप romantic वाटतंय आता ......

मी : मग पुढे .....

ती : बस .. नको अजून पुढे नाही तर ... माझाच control जाईल ....खूप छान लिहतोस तू ......

मी : कस वाटतंय ?

ती : खूप छान .... तूने एकदम romantic करून टाकलस मला ... पण पुढे नको सांगूस काय झाल ... ते मनातच ठेव 

मी : का ? ऐकायची इच्छा नाही ?

ती : तस नाही ...पण ....समज ना तू आता ...आपण  friend आहोत ....

मी : हाहा हो रे कल्ल .... जा आता झोप रात्र झालीय खूप.....

ती : नको बोल तू दुसर काही ... 

मी : जा झोप .....मस्त romantic स्वप्न बघ...चांगल्या feelings घेऊन झोप 

ती : हो ठीक आहे ... झोपते चल ... bye gn .. thanks 

मी : bye bye good night 

0 comments:

शाळा

७. शाळा

18:44 mayur 0 Comments



बसलो होतो खिडकीत डोकं घालून , पाहत होतो कोसळणारा  पाऊस , निवांत शांत सगळं आणि पावसाचं संगीत फक्त ..
बरं वाटत असं शांत निवांत बसून काही तरी पाहत बसणं तेवड्यात सोनल चा call आला , पहिल्यांदा सोनल  केला होता मला वाटलं काही असेल विशेष
मी लग्गेच उचलला

मी - hello

सोनल - अरे वेड्या , online  ये

मी - हा आलोच

मी फोन ठेऊन online आलो

मी - बोल

सोनल - काय करतोस

मी - काही नाही बसलोय असच , बोल ना msg  केलास काही झाला का ?

सोनल - नाही रे , सहजच केला , कंटाळा आलाय रे घरी ..


मी - मग काय विचार काय आहे ?

सोनल  - भेटशील का आज ?

मी - आज ? कधी ? कुठे ? 

सोनल - चल  शाळेत जाऊया  

मी - शाळेशी आठवण येते वाट्त ?

सोनल- हो रे येतोस तू ? जाऊया आपण खरच.. 

मी - हो चालेल , शाळेच्या इथे भेट मग 

सोनल - हो चालेल bye 


मी ठरल्या प्रमाणे वाट बघत उभा होतो , ५ मिनिटे झाली असतील सोनल समोरून चालत येताना दिसली, मी तिच्या समोर गेलो , चेहर्यावर छान  अस हास्य देत मला म्हणाली चला जाऊया ..

मी - हो , ओळखतील का आपल्याला ?

सोनल- हो रे चल तर 

शाळेच्या गेट मधून आत जाताना , सर्व आधीचे दिवस आठवत होते , 
नेहमी घाई घाईत , धावत पळत जायचो , आज आरामात शाळेच्या इमारती कडे पाहत आत गेलो , 

पहिल्या मजल्यावर शिक्षक बसायचे तिथेच गेलो आधी ... 
शिक्षक बसायचे त्या खोलीत प्रवेश करताना वाटायची भीती आजही वाटली, जरा थांबलोच मी , मग हळू हळू आत डोक घालून पाहिलं कोणी ओळखीच आहे का , तेव्हा त्या कोपर्यातल्या शिक्षिकेने आम्हाला ओळ्खल आणि जवळ बोलवलं , आम्ही गेलो 

तृप्ती त्याचं नाव , मराठी शिकवायच्या आणि इतिहासही , ओलायला छान होत्या , शिकवायच्या हि छान , मला तर आवडायचं त्याचं शिकवण , सोनल ने त्यांना विचारलं कश्या आहात तुम्ही ?

शिक्षिका - मजेत , तुम्ही कसे  आहात ?

दोघ - आम्ही पण मजेत ... 

मग काय करतो कस करतो त्या गप्पा झाल्या .....आणि मी म्हणालो चाल ४ थ्या floor वर जाऊया कॉम्पुटर रूम मध्ये , त्या teacher असतील ...आम्ही सर्व जिने चडत वर जात होतो तस तस शाळा नावाची आई आम्हाला गोंजारत होती , तिच्या मायेची उभ अजूनही जाणवत होती , जिने चढताना सोनल २-३ वेळा तरी बोल्ली असेल "खूप मस्त वाटतंय रे ..!"

कॉम्पुटर रूम मध्ये गेलो त्याचं teacher होत्या शिकवत होत्या मुलांना , आम्हाला पाहिलं आणि मुलांना काही तर करायला सांगून आमच्या जवळ आल्या आणि दुसऱ्या वर्गात घेऊन गेल्या जिथे कोणी न्हवत , आणि खूप आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर , खूप काही विचारल त्यांनी काय करता , कस काय , मज्जा येते कि नाय ....आम्ही सगळ सांगत होतो पण शाळेची आठवण येते ...अस मध्ये मध्ये मनात किव्वा बोलण्यात येतच होत .

त्या teacher वयाने छोट्या होत्या त्यामुळे त्यांना काळत होत आमच शाळेबद्दलच प्रेम ... त्याही हसऱ्या चेहऱ्याने ऐकत होत्या आणि कसल्या तरी समाधानाची जुळूक अधून मधून त्यांच्या डोळ्यात दिसत होती , त्यांना कसलं समाधान मिळत होत ते नाही ठाऊक पण शाळेच्या मायेच्या कुशीत आम्ही खुश होतो 

खूप वेळ आम्ही तिथेच गप्पा मारत होतो ... खूप साऱ्या शाळेच्या आठवणी एकामागून एक बाहेर येत होत्या ...
आणि आमच्या सोबत त्या शिक्षिका हि ....

काही वेळाने त्यांचा निरोप घेऊन खाली येत असताना मुख्याध्यापक च office दिसलं पण तिथे जायची काय आमची हिम्मत झाली नाही .. मग तसच शाळेच्या बाहेर आलो ... आणि सोनल माझ्या डोक्यावर शाळेतल्या सारखी टपली मारत बोलली आज तुझी पाळी ...


त्या दिवशी garden मध्ये chinese वडापाव दिला होता आठवलं मला ....

मी - हो आठवलं ... शाळेचा chinese वडापाव तू garden मध्ये दिला होता ...आता शाळेची आठवण देणारा ..खाऊया ..

आमच्या दोघांची वारी निघाली chinese वडापाव कडे...तिथे तेच काका होते ..

मी - काय काका ओळ्खल का ?

काका - हो .. वडापाव देऊ न ?

मी - हो द्या

काका -( वडापाव देत ) शाळा झाली तुमचीआता काय मग ?

आम्ही दोघ - आता college ....

वडापाव घेऊन आम्ही खात खात रस्त्याने चालत होतो ...मनात आणि जिभेवर आठवणीं ची चव चाखत होतो .....



 







0 comments:

तो दिवस ३ वर्षा आधीचा

६. तो दिवस ३ वर्षा आधीचा

15:20 mayur 0 Comments



हळू हळू कळू लागल होत अभिलाषा काही तरी लपवतेय माझ्या पासून, तिच्या वागण्या बोलण्यात तो बदल जाणवत होता मी आधी जास्त लक्ष नाही दिल, पण नंतर जास्तच जाणवायला लागला तिच्यातला तो बदल, लपवायची माझ्या पासून काही तरी, त्या दिवशी भेटली तेव्हा तिच्या मनाची चल-बिचल  स्पष्ट काळात होती, आज नजरेला नजरही भिडत नव्हती,मी विचारलं काय झाल , काही वेळ शांतच राहिली आणि मग बोलली, तुला काही तरी सांगायचं, रागाऊ नकोस,

मी - बोल ना !

ती - एक मुलगा आहे 

मी - समीर ना ?

ती - ( दचकलीच )  तू कस ओळ्खल ?

मी - जस तुला ओळखतो , तस तुझ्या मनतल पण ओळ्खल .... 

ती - बघ ना , आपल तर होऊ शकत नाही ... मग .....

मी - किती महिने झाले तुमच सुरु आहे ...... ???

ती - २ महिने 

मी - मग ?

ती - मग काय ??

मी - आपल नाही होऊ शकत मग तुमच होईल ??

ती - तस नाही पण तो माझ्या जातीचा आहे 

मी - मग त्याचा chance जास्त आहे ?

ती - हो , तस पण नाही जर dad ने परवानगी दिली तर जात आधी बघणार ना 

मी - हा ! बरोबर आहे तुज, तुज future चांगल झाल पाहिजे 

ती - आपण राहूया संपर्कात 

मी - का ? 

ती - i know तुला वाईट वाटतंय 

मी - नाही...... अस काही नाही, तुज चांगल होणार असेल तर मला आनंदच आहे ... 

ती - सांग तुला काय वाटतंय 

मी - बर , वाटल तू सांगितलस तर .. चांगल होईल आता सर्व ... 

ती - तूच बोलण खूप imp आहे माझ्या साठी , कारण तू जास्त ओळखतोस मला 

मी - हो , तुज वाईट तरी नाही बघणार मी , चांगला मुलगा आहे तो , सांभाळेल तुला .... 

(  त्या दिवशी जी मिठी मारली ती प्रेमाची शेवटी मिठी नंतर सुरु झाल तो निव्वळ देवाण-घेवाणीचा खेळ  )

ती - हो ! चल bye नंतर भेटूया कधी तरी ......

मी - bye bye काळजी घे 

( Love can't be found Where it doesn't exist ..      )  
     

0 comments:

कुणी रडवाव तर कुणी हसवाव

५. कुणी रडवाव तर कुणी हसवाव

22:00 mayur 0 Comments



प्रेमी जोडप्यात भांडण काही नवीन नाही, रुसवे फुगवे, मग राग विसरून परत जवळ येण अस चालूच असत.
काल ६ महिने झाले झाले माझ्या आणि अभिलाषा च्या relationship ला, म्हणून एका हॉटेल मध्ये भेटायचं ठरवलं,
ठरल्या प्रमाणे गेलो हॉटेल मध्ये , order दिली जेवणाची, आणि गप्पा मारत होतो, अभिलाषा पण छान पंजाबी dress मध्ये होती, 
बोलता बोलता तिने अचानक मला विचारलं 

ती - "६ महिने झाले आता, तुझा विश्वास आहे माझ्यावर ?"

मी - "का काय झाल ??"

ती - "सांग तर "

मी - "हो आहे न ..६ महिने विश्वास आहे म्हणून आहोत न !!"

ती - "हो, पण माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर ...माझा विश्वास नको तोडूस, कुठे दुसरीकडे असेल तर सांग  please "

इथून मग भांडणाला तोंड फुटल, कालचा पूर्ण दिवस भांडत गेला, घरी आल्यावर पण message ने भांडणच सुरु होत, 

आज सकाळी शाळेच्या group वर message आला कि सर्वांनी garden मध्ये भेटायचं, सर्वांचा होकार पण आला, सकाळच college करून संध्याकाळी garden च्या दिशेने निघालो, रस्त्यातच सोनल भेटली मला , शाळेच्या group मधली मैत्रीण, मग तिच्यासोबत गेलो garden मध्ये गेलो, मी तीला विचारलं अरे आज सर्व जन येणार होते शाळेतले तूच आलीस बाकीचे कुठे आहेत,

सोनल - "अरे नाही येणार ते plan cancel झाला त्यांचा "

मी - "मग तू ?"

सोनल - "अरे मी इथेच जवळ राहते , आज आले असच garden मध्ये "

मी - "sorry हा तुला त्रास माझ्या मुळे, मी जातो तू कर enjoy"

सोनल - "अरे थांब , मी एकटीच आहे, कोणाला भेटायला नाही आले, तास पण शाळेतले मित्र कुठे भेटतात आज काल "

मी - "बर ठीक आहे "

मग आम्ही garden मध्ये एक छोटस तलाव आहे आणि त्याच्या भोवती बसायला जागा आहे, इथे जाऊन बसलो 

मी - "मग काय चालू आहे सध्या ?"

सोनल - "college अजून काय चालू असणार "

मी - "माझ पण"

काही वेळ असाच शांततेत गेला ..

सोनल - "काय साहेब , शांत शांत  मूड ठीक नाहीय वाट्त ?"

मी - "नाही तस काही नाही, college, परीक्षा येईल न आता त्याच "

सोनल - "प्रियासी कशी आहे तुझी ??  काय नाव तीच ....हा अभिलाषा  न ?"

मी - "हो , बरी आहे ती पण "

सोनल - "break up झाला काय ?"

मी - "नाही ग , भांडण " 

सोनल - ( गालातल्या गालात हसून ) "तरीच साहेब एवढे उदास दिसताहेत "

मी पुढे काहीही बोललो नाही.

सोनल - "५ मिनिटे थांब मी आलेच "

मी - "हो , चालेल " 

  माझ अस कधी होत नाही सहसा कि मनातल लग्गेच कोणा दुसर्याला सांगितलं , आज अचानक सांगितलं , मी माझ्यावर अचंबित झालो होतो 
 सोनल तशी हुशार मुलगी, शरीराने उंच , रेखीव , चालण्यात बोलण्यात एक ठाम पणा असायचा आजही आहे, आणि भेटल्या भेटल्या चक्क मला फक्त पाहून ओळखल-माझ काही तरी बिनसलंय , अस झाल नव्हत माझ्या बाबतीत.

सोनल - "हे घे"

मी - "काय आहे ?"

सोनल - "तुझ आवडत"

मी - (उघडून बघतो ) "अरे वाह chinese वडापाव !!!!"

शाळेत आम्ही chinese वडापाव खूप खायचो , रोज एकेकाची पाळी असायची, एक जास्त वडापाव घ्यायची मग तो सर्वात वाटून खायचा  आणि जो नाही देणार त्याची पिटाई असायची,

सोनल - "३ आहेत, १ जास्त , आज माझी पाळी "

आणि आम्ही दोघ हसू लागलो, मी तर विसरूनही गेलो होतो पण सोनलने मला आठवण करून दिली, शाळेतल्या आठवणी खरच जगावेगळ्या असतात आणि न  विसरता येणार्याही.

मी - "एक हसी कि किमत क्या तो chinese वडापाव , एक दोस्ती कि किमत क्या तो chinese वडापाव, एक मिठीसी याद कि किमत क्या तो ये chinese वडापाव "

सोनल - हसून "व्हा , साहेब मस्तच , चला आधीचा तू तरी भेटलास त्या निमित्ताने "

मी - "अस का ?"

सोनल - "शाळा संपली , नंतर खूप बदललं रे सर्व, तुझ्या भाषेत सांगायचं तर काही जण हरवले अन काही जण सापडलेत तरी हरवल्या सारखे वाटतात"

मला काळत होता तिच्या बोलण्याचा अर्थ, शाळा संपल्यावर जवळचे दूर जातात , आणि जे असतात त्यांचे स्वभाव-वागण बदलत जात, आपण आठवत राहतो पण ते आधीचे दिवस,  शाळेचे दिवस....

मी - "काय करणार , life आहे असच होत असत , कोणी सोबत असो व नसो जागाव तर लागतच "

सोनल - "हो का म्हणूनच मगाशी upset होतास, (अभिलाषा) सोबत नव्हती म्हणूनच न ? सर्वांना सोबत हवी असते "

मी शांत तिच्याकडे पाहत होतो , मला सुचल नाही तेव्हा काय बोलू , काही वेळाने तिनेच विषय बदलला आणि शाळेतल्या गप्पा सुरु झाल्या 
तासभर गप्पा मारल्या , मग निघताना "खूप छान आहेस तू बोलायला , वागायला पण असा upset राहू नकोस, चल bye bye भेटू नंतर ........."

0 comments:

अभिलाषा

४. अभिलाषा

02:09 mayur 0 Comments




त्या दिवशी सिनेमा पाहायला गेलो होतो , आठवतोय तो दिवस आजही मला, जास्त गर्दी नव्हती , ती नेहमी सारखी माझा हात हातात घेऊन सिनेमा पाहत होती, अन मी अधून मधून तिच्या कडे पाहत होतो , काही वेळाने माझ्या खांद्यावर डोक ठेवलं आणि काही वेळ अशीच होती, तिचे केस माझ्या डोळ्यात जाऊ नयेत म्हणून मी तिचे केस सावरायला गेलो , अन तीने चेहरा माझ्या कडे केला, मी smile दिली, पण ती असच पाहत राहिली मला, तिचे ते डोळे माझ्या कडे निराळ्याच नजरने पाहत होते, मी डोळ्याच्या भोवया उंचावल्या तर तिने लग्गेच मान खली घातली, मी उजवा हात तिच्या खांद्यावर टाकून तीला जवळ घेतलं आणि कानात म्हंटल 

"काय झाल??" समोरून मन हलवून नकार आला, मी लग्गेच डाव्या हाताने तिचा चेहरा माझ्या जवळ केला आणि माझे ओठ तिच्या ओठांजवळ नेले, तिच्या ओठांतून शब्द आला "थांब" मी थांबलो आणि पाहत राहिलो तिच्या कडे , तिने आपला चष्मा काढून बाजूला ठेवला आणि पुढे माझ्या जवळ बघताच मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले तिचे डोळे बंद झाले होते आणि आमच्या ओठांची हालचाल सुरु झाली होती, ओठ ओठांशी जणू खेळत होते , इतक्या सहजतेने ते होत होत , काही काल त्याच क्षणात आम्ही गुंतून गेलो , मग लाळ ओठावर येऊ लागली , मला वाटल थांबूया आता पण समोर ओठांची हालचाल आता अधिकच वाढत होती, आणि मी त्यावर प्रतिक्रिया देत होतो, हळुवार होणार ओठांच घर्षण आता मध्ये मध्ये जोरात होत होत, ओठांची हालचाल वाढत होती, तेवढ्यात तिने आपल्या ओठांच्या पाकळ्यात माझा खालचा ओठ दाबून धरला आणि माझ्या अजून जवळ आली, माझा हात तिच्या गालावरून मागे गेला अन ओठ काही क्षणासाठी वेगळे झाले आणि परत जवळ झाले, आता मात्र अंगात वेगळीच शीव-शीव येत होती, 
एक जोम येत होता, हव्यास वाढत होती, स्पर्श अजून अजून करावासा वाटत होता.....

तेवड्यात सिनेमा संपला , ती लग्गेच बाजूला झाली, ओढणी सावरली, मीही shirt वेगेरे व्यवस्तीत केल, अस पहिल्यांदाच झाल होत, तर काही काल आम्ही गांगृनच केलो होतो सिनेमा संपला होता, दोघ उठलो आणि रांगेसोबत बाहेर जाऊ लागलो, बाहेर आलो तर तिच्या चेहरा थोडस गोंधलेला झाला होता, तरी ती मध्ये मध्ये माझ्या जवळ पाहून लाजत होती , हसत होती , माझ्या सोबत चालताना कधी माझा हात पकडत होती, कधी गाण गुणगुणत होती, एकदम खुश होती, अस तीच कधी होत नव्हत सहसा, शांत असायची नेहमी, एवडी स्वतंत्र मला या आधी कध्धीच वाटली नाही 

काही इच्छा पूर्ण झाल्या कि , मनात आनंदाच्या लहरी वाहू लागतात , आणि आपण त्यात वाहत जाव ......

0 comments:

भेट

३. भेट न विसरणारी ...

18:28 mayur 0 Comments







कधी आस पास तू , कधी मोकळ्या आभाळात तू 
त्रास देणाऱ्या उन्हात तू , नुकतीच आलेली वाऱ्याची झुळूक तू 
मला लागलेली प्रेमाची तहान देखील तूच 




तेव्हा काही बोलली नाही पण घरी आल्यावर message ने बोललीच "आपला स्पर्श झाला आज" 

मी - हो,  झाला पण .................



खूप लाजाळू आणि नखरेल , माझी पहिली हक्काची , प्रियसी....typical love story.. फिरायच, दंगा करायचा, भांडायचं सर्व.... एकदम कोमल नाजूक फुलासारखी ... खूपच भाऊक आणि माझ्यावर प्रेम करणारी 

गप्प गप्प असायची , जास्त काही बोलायची नाही पण कळायचं तिच्या डोळ्यात काय चाललाय ते, वरून साधी भोळी वाटायची पण आतून मनाची चल-बिचल सुरु असायची, modern कपडे नेहमी ... fashion designer व्हायचं होत तीला, समोरून आली कि जणू पाहतच रहावस वाटायचं मला आणि आजही वाटत. कधी एकांतात असलो कि माझा हात पकडायची .. कांद्यावर आपल डोक ठेवायची आणि डोळे बंद करून कित्तेक तास घालवायची 

आज गेलो होतो भेटायला , स्पर्श झाला तेच बोलत होती मगाशी , 
३ वर्षा नंतर गेलो भेटायला , काहीही बदलली नाहीय अजून आहे तशीच आहे ... 

पण आज जरा हळवी झाली होती ... बस मध्ये bye बोललो तेव्हा  घरी आल्यावर message नेही जास्त काही बोललो नाही  पण जाणवलं मलाही miss करतेय मला, ती दाखवत नाहीय , कारण तीच सोडून गेलीय ३ वर्षा पूर्वी, आज असच भेटायला बोलावलेल, मलाही बर वाटल , कोणी तरी स्वताहून अस प्रेमाने बोलावलं तर....... माझ्या मनात राग नाहीय तिच्या बद्दल ,कारण तीच दुख कळतंय मला आणि कदाचित माझ हि तीला कळत असाव. 
  
"अभिलाषा" तीच नाव 

आज भेटलो तेव्हा त्याच आधीच्या style ने माझ नाव घेतलं , आणि चेहऱ्यावर हसू , 
मी म्हंटल "आज आमची आठवण कशी ?"
काहीच बोलली नाही , फक्त पाहत होती माझ्या जवळ 
तिच्या चेहऱ्यावरच ते हसू आता... हळू हळू नाहीस होवू लागल होत आणि ती उगाचच mobile मध्ये पाहत होती 
मी mobile बाजूला करून तिचा हात हातात घेतला आणि बोल्लो - "काय झाल ?"

ती- "खूप त्रास दिला ना मी तुला, आता वाईट वाटतंय, तू आलास भेटायला thanks"

मी- ( मी माहोल जरा हलका करण्यासाठी बोललो )  एवडच ना , मला वाटल लग्न वेगेरे ठरलं कि काय तुझ ???

हसता न्हवत येत तीला , मान खाली घातली आणि माझा हात घट्ट पकडून धरला आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा येऊ लागल्या 
मी ते तस तीच रडण मूर्ख माणसासारख पाहत होतो, खूप वाटत होत जाऊन तीला सावराव , हसवाव पण तेव्हा काय झाल काय माहित 
मी तसाच तिचा हात हातात घेऊन पाहत होतो तीला, कोणी तरी आपल्या अंगातली पूर्ण शक्तीच काढून घेतलीय अस वाटू लागल,  तिनेच मग डोळे पुसले, कदाचित तीच ते दुख इतक मोठ असेल कि माझ्याने सावरल नसत गेल, खूप विचित्र क्षण होता तो, कुणी तरी आपल्या खूप जवळ आहे, पण जाणवत नाहीय ....कुणी तरी हाक मारतय पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नाहीय अस झाल होत मला.......

तिचा हात जरी माझ्या हातात असला तरी मन एका गुंतागुंतीच्या पाळण्यावर हिंदोळे घेत होत, हे एका बाजूला  आणि रडून लालबुंद झालेला तिचा चेहरा, मला अपराधी पणाची जाणीव करून देत होता.   

आपण कितीही दाखवलं आपल्याला त्रास होत नाहीय , आपल सर्व ठीक चाललाय तरी.... मनातल ते कधी तरी कस तरी बाहेर येतच ....... 

0 comments:

कोण हि स्मिता

२. कोण हि स्मिता

15:11 mayur 0 Comments




हि माझ्या शाळेतली मैत्रीण , शाळेत असताना बोलली नाही माझ्याशी, कधी दंगा मस्ती मध्ये पण नव्हती, शांत असायची  पण नंतर एकदा भेटली मला बस मध्ये आणि contact no दिला तिने, स्वभावाने आणि दिसायला हि छान होती,

गोरा रंग, घारे डोळे, डोळ्यांना काजळ, गोल चेहरा, हसायची तर गालावर छोटीशी खळी यायची, 

तिची नजरच सर्वांना घायाळ करून टाकत, मला कळायचं थोड थोड हिच्यात खूप मस्ती आहे पण हि दाखवत नाहीय, पण एवड नंतर मी पण लक्ष नाही दिल 

शाळा पूर्ण झाल्यावर भेटली तेव्हा बरीच बदलली होती, केसांची ठेवण, बोलताना थोड मोकळे पने बोलत होती, मी तर स्पष्ट च बोलायचो आधी पासून तर  तिलाही माहिती होतच 

थोडी जाडी झाली होती पण ते नजरेच घायाळ कारण अजून तसच होत, त्या दिवशी मस्त पिंक top आणि jeans घातलेली , आणि ती स्व:तहुन बोलायला आली त्याच जास्त 
नवल वाटल मला.....

तिच्या top वर "do you like me ?" अस लिहलेली .. आज काल काहीही लिहलेल असत t-shirts वर 

त्या दिवशीच्या रात्री ८ वाजता मी तीला फोन केला ती उचलताच बोललो 
yes, i like you...

ती - काय ? ( असे धक्के द्यायला मला खूप आवडत )

मी - अरे तुझ्या t-shirt वर लिहाल त्याच answer दिल मी 

ती - ( जवळ जवळ ५ मिनिटे हसत होती ), पागल आहेस तू खरच , तसाच आहेस अजून बदलला नाहीस 

मी - तू बद्दलीस कि खूप 

ती - हो का ... 

मी - हो ना , बर वाटल एवढ्या freely बोललीस आज , शाळेत नव्हतीस अशी, आणि सुंदर दिसत होतीस शाळेपेक्षा, nice figure 

ती - इतक notice केल तू ? काय विचार काय हा ?

मी - मी सर्वांना notice करतो , तुला काही प्रोब्लेम आहे का अस notice केल तर 

ती - नाही रे .. कर भिन्दास मैत्री आहे आपली चालत त्यात ....

मी - हो न .. तस पण असाच आहे ...कोणाला आवडो न आवडो ..जे आहे ते बोलतो मनातल 

ती - असच असल पाहिजे , चल आता bye ...tc 

मी - bye bye 


हि जरा dump type होती, पण काही तरी होत तिच्यात जे मला विचार करायला लावायचं तिच्या बाबतीत.....
....वेळ बदलला कि माणस बदलतात आणि माणस बदलली कि भावना बदलतात.....

0 comments:

#मैत्री #मध्ये #प्रेम

१. सकाळचे ५ वाजले होते

14:32 mayur 0 Comments




नुकताच झोपेतून उठलो डोळे चूर चुरत होते, light बंद होती, उठलो light चालू केली सकाळचे ५ वाजले होते, कॉम्पुटर चालू केला, fb वर स्मिता चा massage होता ती  जागी होती अजून,

मी विचारलं अजून जागी का ? समोरून replay आला "अरे झोप नाही लागत, तू रात्री बोलत होतास माझ्याशी ...आणि मधेच झोपलास"

मी - "हा रे झोप लागली मला ... "(मुद्दाम झोपलो मी)

स्मिता - "हा ठीक आहे, तू कसा उठलास एवड्या लवकर"

मी- "तू झोपली नाहीस ना, मला miss करत अशील तर आली मला पण जाग"

स्मिता- "हो का ... ऐक न तुला कस कल्ल कि माझ्या डाव्या पायाला लागलाय तिथे एक तील पण आहे ??"
"म्हणजे accurate कस सांगू शकतो तू ???"

मी - "मला नाही माहित जाणवत मला अस कोणासोबत जास्त वेळ बोललो किव्वा वेळ घालवला तर... "

स्मिता - "तू झोपलास मधेच मी खूप घाबरले रे.. एवड कस कल्ल तुला तू काही black magic करतोस का ?? खर खर सांग"

मी - "नाही रे.. जाणवत मला अस ...कधी कधी .. तुझ्या बाबतीत जाणवलं तर बोललो "

स्मिता - "मी कोणाला सांगितलं नाही , कोणी पहायचा तर प्रश्नच नाही, न सांगता कल्ल तुला...."

मी - "हो, तू इतकी सुंदर आहेस....कोणालाही आवडेल तुझ्या विषयी अजून जाणून घ्यायला आणि मला वाटल ते बोललो मी...
काळजी नको करूस नाही सांगणार कोणाला... मैत्री आहे आपली...आणि मी नाही कोणाचे secret असे सांगत दुसर्याला ...जा झोप आता "

स्मिता- "हो रे एवड तर विश्वास आहे तुझ्यावर .. bye bye tc  " 

मी - "bye bye "

0 comments: