ओळख

९. बस खराब झाली अन ....

21:57 mayur 0 Comments





college चे सुरुवातीचे दिवस होते, १ आठवडा झाला असेल जेमतेम, नवीन मित्र, नवीन सभोवतालच वातावरण, आणि नवीन ओळख

बस stop वर असायची उभी college सुटल्यावर, कधी दिसायची कधी नाही. पण त्या ४-५ दिवसात सतत दिसायची college वरून घरी जाताना, त्या दिवशी मी smile दिली , तिनेही smile दिली, इतक सहज झाल ते कि वाटलच नाही कोणी अनोळखी व्यक्ती ला मी अस smile देतोय. पंजाबी dress मध्ये चष्मा घालून, हातात सतत खेळणारा mobile, गोरा चेहरा, काळेभोर केस, दिसायला सुबक, उंचीला कमी तरी शोभून दिसायची, अस सर्व असताना त्या मुलीने माझ्या smile ला smile ने उत्तर दिल.

त्या आचार्याने मी तिच्याकडे पाहत होतो तेवड्यात बस आली, मी तिच्या आधी चढलो आणि मला माहित आहे ती “महिलांसाठी” त्याच seat वर बसणार आहे म्हणून मी त्याच्या मागच्या seat वर जाऊन बसलो. बस मध्ये जास्त गर्दी नव्हती ती कुठेही बसू शकत होती. पण ती माझ्या पुढच्याच seat वर बसली. दुसरा अशार्याचा धक्का, काही वेळाने बस सुरु झाली. तिने काही माझ्या कडे मागे वळून पाहिलं नाही पण मी मात्र मागून तिलाच पाहत होतो कारण इतक्या जवळून मी नव्हत पाहिलं तीला.

तिचा चेहरा दिसत नसला तरी तिचे नीट विंचरलेले केस, केसातला क्लीप अस काही उगाचच पाहत होतो, बस ५-६ stops  गेल्यावर अचानक थांबली, “बस खराब झाली” ,”उतरा ..उतरा ” असे आवाज माझ्या कानी येऊ लागले. ती उठली अन लग्गेच उतरली पण बस मधून, मी पण उतरलो अन तीला शोधू लागलो, बस मधले सर्व जन उतरल्यामुळे मला काही ती दिसनासी झाली, तेवड्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर २ वेळा हळूच tap केल. ती सापडत नाही अन कोणी मागून tap करतय...?

मागे वळून पाहिलं तर चक्क तीच .....३ रा धक्का

मी : (अडखळत) हेलो ..hi

ती: hi ..कोणाला शोधतोय ?

मी : (गालात हसून) तुलाच

ती : मी मागे उभी होती, मला वाटल तू मागून उतरशील

मी : तू उतरलीस न मग तुझ्या मागूनच उतरलो ..but तू ...

ती : दुसरी बस पकड मग आता

मी : तू ?

ती : नाही २ stop आहेत चालत जाईन मी

मी : चल मी पण येतो .. चालेल न ? (अस पहिल्यांदाच केल मी कोणा मुलीला विचारलं )

ती : हो चालेल पण तू कुठे राहतोस ?

(मी खूप लांब राहत होतो पण बोललो)

मी : अरे इथे माझ्या मित्राच office मध्ये भेटन त्याला

ती : चल मग

अस मग सोबत चालत होतो ... खूप मस्त बोलत होती, ऐकतच रहावस वाटत होत पण मीच  जास्त बोलत होतो माहित नाही का ??   

तिच्या कडे मी भिन्दास पाहत होतो अन तीही माझ्या कडे ..स्पष्ट बोलत होती, वाटतच नव्हत पहिल्यांदा बोलतोय,.आम्ही २-३ वेळा तरी बस मधून उतरल्यावर जे झाल त्यावर हसलो .. माहित नाही का!

गोलसर चेहरा, हसताना गुलाबी रंगाचा glow यायचा तिच्या चेहऱ्यावर, फक्त जराशी हसली तरी गालावर खळी यायची अस सगळ पाहून मी जास्तच उतावळेपण दाखवत होतो अन  बडबड करत होतो. तीही माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत होती. समजून घेत होती मी काय बोलतोय ते.
कोणी दोन मानस जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा काय बोलत असतील तेच ती बोलत होती, मी मात्र उगाच पटेली मारत होतो. तरी ती शांत आणि नेमक उत्तर देत होती. बोलताना तिच्या ओठांची हालचाल अशी काही ह्यायची कि वाटायचं कि बोलायचं दुसर अन बोलतेय दुसर, मला तर निराळच वाटत होत

ती : चल आता जा तू मी जाईन

( वाऱ्याची झुळूक येऊन लग्गेच नाहीशी होते तसा काहीसा क्षण होता माझ्यासाठी ...... लग्गेच आला तिचा stop ... असा विचार करत मी उत्तर दिले )

मी : हो bye

आणि ती समोरून निघून गेली अन मी माझ्या घरच्या परतीचा रस्ता धरला


काही धक्के चांगले वाटतात प्रेमाने दिले तर.....        

0 comments:

#romantic,

८. एक romantic संवाद

16:23 mayur 0 Comments







नेहमी प्रमाणे रात्री १० ला तिचा msg आला ...

ती : हेल्लो , जेवलास का ?

मी : हो आणि तू ?

ती: मी पण आत्ताच ... आज कंटाळा आलाय रे खूप 

मी : का ग ? काय झाल ?

ती : माहित नाही , काही तरी वेगळ बोलूया आज 

मी : वेगळ ...काही तरी खास ??

ती : हो...काही तरी खास 

आम्ही दोघ अस रोज गप्पा मारायचो रात्री , खूप गप्पा ह्यायच्या , कश्यावरही बोलायचो त्या दिवशी ती बोलली काही तरी वेगळ बोलूया आणि मी सहजच तिच्या ललग्नाबद्दल विचारलं 

मी : तुझ लग्न कधी होईल ?

ती : ३-४ वर्षात , का रे तूला घाई लागलीय का लग्नाची माझ्या ?

मी : हो! तू कर लग्न आणि सांग मला लग्ना नंतरची मज्जा 

ती : हट , अस कोणी सांगत का?? 

मी : सांगू नाही शकत , imagine तर करू शकतो ना ?

ती : मला नाही जमत अस काही imagine करायला ..तूच सांग तुला काय वाटतंय ते 

मी : हो का .... मी शिकवतो मग तुला ...समज तुझ लग्न झालाय ...लग्ना नंतरचा दुसरा दिवस आहे 

ती : मग पहिला दिवस ?

मी : पहिल्या दिवशी पाहुणे वेगेरे असतात ना 

ती : हाहाहा ... बरोबर ... २ रा दिवस पुढे 

मी : लग्नानंतर च्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून , मस्त अंघोळ वेगेरे करून , तुझ्या आवडत्या रंगाची साडी नेसून , आपल्या  पती साठी चहा घेऊन जात आहेस 

ती : हिरवा रंग ... साडीचा .. मला खूप आवडतो 

मी : हिरव्या रंगात ... नुकतीच अंघोळ केलेली ... ओले केस ....आणि बेडरूम मध्ये चाललीस चहा घेऊन 

ती : wow मस्त .. पुढे बोलत राहा 

मी : बेडरूम मध्ये  येतेस ... तुझे पतीदेव झोपलेले असतात .... समोरच्या टेबलावर चहा ठेवतेस आणि त्याला उठावण्यासाठी हाक करतेस 

ती : मी नावानेच हाक मरेन माझ्या hubby ला 

मी : हो काहीही बोल  ...तुझाच आहे तो .....

ती : हेहे हा ... पुढे सांग 

मी : हाक मारून पण ते उठत नाहीत ... मग तुझ लक्ष कपाटाच्या आरश्याकडे जात ....त्यात तुझ सुंदर आणि मोहक रूप जणू काही तुलाच पाहत असत.तू आरश्यात स्वतःला नेहाळत असतेस...

ती : कस सुचत रे तुला ? मला तर वाचूनच छान वाटायला लागलाय , अस वाटतंय खरच लग्न झालाय माझ ...बोल तू मी वाचतेय 

मी : हिरवा बांगड्यांचा चुडा , ओले मोकळे केस , हिरव्या रंगाची सुंदर साडी , गळ्यात मंगलसूत्र , कपाळावरच नुकतच लावलेलं कुंकू अस सर्व पाहण्यात तू स्वतामधेच  हरवून जातेस....

ती : किती मस्त रे .... 

मी : तू स्वतःमध्ये गुंतलेली असतेस ....आणि तेवड्यात तुझा hubby अचानक येतो आणि मागून मिठी मारतो तुला , त्या एक हाथ तुझ्या पोटावरून घरंगळत बेंबी च्या दिशेने जातो आणि दुसऱ्या हाताने तुझा एक हाथ घट्ट पकडून ठेवतो 

ती : अंगावर काटा आला माझ्या ... खूप romantic वाटतंय आता ......

मी : मग पुढे .....

ती : बस .. नको अजून पुढे नाही तर ... माझाच control जाईल ....खूप छान लिहतोस तू ......

मी : कस वाटतंय ?

ती : खूप छान .... तूने एकदम romantic करून टाकलस मला ... पण पुढे नको सांगूस काय झाल ... ते मनातच ठेव 

मी : का ? ऐकायची इच्छा नाही ?

ती : तस नाही ...पण ....समज ना तू आता ...आपण  friend आहोत ....

मी : हाहा हो रे कल्ल .... जा आता झोप रात्र झालीय खूप.....

ती : नको बोल तू दुसर काही ... 

मी : जा झोप .....मस्त romantic स्वप्न बघ...चांगल्या feelings घेऊन झोप 

ती : हो ठीक आहे ... झोपते चल ... bye gn .. thanks 

मी : bye bye good night 

0 comments:

शाळा

७. शाळा

18:44 mayur 0 Comments



बसलो होतो खिडकीत डोकं घालून , पाहत होतो कोसळणारा  पाऊस , निवांत शांत सगळं आणि पावसाचं संगीत फक्त ..
बरं वाटत असं शांत निवांत बसून काही तरी पाहत बसणं तेवड्यात सोनल चा call आला , पहिल्यांदा सोनल  केला होता मला वाटलं काही असेल विशेष
मी लग्गेच उचलला

मी - hello

सोनल - अरे वेड्या , online  ये

मी - हा आलोच

मी फोन ठेऊन online आलो

मी - बोल

सोनल - काय करतोस

मी - काही नाही बसलोय असच , बोल ना msg  केलास काही झाला का ?

सोनल - नाही रे , सहजच केला , कंटाळा आलाय रे घरी ..


मी - मग काय विचार काय आहे ?

सोनल  - भेटशील का आज ?

मी - आज ? कधी ? कुठे ? 

सोनल - चल  शाळेत जाऊया  

मी - शाळेशी आठवण येते वाट्त ?

सोनल- हो रे येतोस तू ? जाऊया आपण खरच.. 

मी - हो चालेल , शाळेच्या इथे भेट मग 

सोनल - हो चालेल bye 


मी ठरल्या प्रमाणे वाट बघत उभा होतो , ५ मिनिटे झाली असतील सोनल समोरून चालत येताना दिसली, मी तिच्या समोर गेलो , चेहर्यावर छान  अस हास्य देत मला म्हणाली चला जाऊया ..

मी - हो , ओळखतील का आपल्याला ?

सोनल- हो रे चल तर 

शाळेच्या गेट मधून आत जाताना , सर्व आधीचे दिवस आठवत होते , 
नेहमी घाई घाईत , धावत पळत जायचो , आज आरामात शाळेच्या इमारती कडे पाहत आत गेलो , 

पहिल्या मजल्यावर शिक्षक बसायचे तिथेच गेलो आधी ... 
शिक्षक बसायचे त्या खोलीत प्रवेश करताना वाटायची भीती आजही वाटली, जरा थांबलोच मी , मग हळू हळू आत डोक घालून पाहिलं कोणी ओळखीच आहे का , तेव्हा त्या कोपर्यातल्या शिक्षिकेने आम्हाला ओळ्खल आणि जवळ बोलवलं , आम्ही गेलो 

तृप्ती त्याचं नाव , मराठी शिकवायच्या आणि इतिहासही , ओलायला छान होत्या , शिकवायच्या हि छान , मला तर आवडायचं त्याचं शिकवण , सोनल ने त्यांना विचारलं कश्या आहात तुम्ही ?

शिक्षिका - मजेत , तुम्ही कसे  आहात ?

दोघ - आम्ही पण मजेत ... 

मग काय करतो कस करतो त्या गप्पा झाल्या .....आणि मी म्हणालो चाल ४ थ्या floor वर जाऊया कॉम्पुटर रूम मध्ये , त्या teacher असतील ...आम्ही सर्व जिने चडत वर जात होतो तस तस शाळा नावाची आई आम्हाला गोंजारत होती , तिच्या मायेची उभ अजूनही जाणवत होती , जिने चढताना सोनल २-३ वेळा तरी बोल्ली असेल "खूप मस्त वाटतंय रे ..!"

कॉम्पुटर रूम मध्ये गेलो त्याचं teacher होत्या शिकवत होत्या मुलांना , आम्हाला पाहिलं आणि मुलांना काही तर करायला सांगून आमच्या जवळ आल्या आणि दुसऱ्या वर्गात घेऊन गेल्या जिथे कोणी न्हवत , आणि खूप आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर , खूप काही विचारल त्यांनी काय करता , कस काय , मज्जा येते कि नाय ....आम्ही सगळ सांगत होतो पण शाळेची आठवण येते ...अस मध्ये मध्ये मनात किव्वा बोलण्यात येतच होत .

त्या teacher वयाने छोट्या होत्या त्यामुळे त्यांना काळत होत आमच शाळेबद्दलच प्रेम ... त्याही हसऱ्या चेहऱ्याने ऐकत होत्या आणि कसल्या तरी समाधानाची जुळूक अधून मधून त्यांच्या डोळ्यात दिसत होती , त्यांना कसलं समाधान मिळत होत ते नाही ठाऊक पण शाळेच्या मायेच्या कुशीत आम्ही खुश होतो 

खूप वेळ आम्ही तिथेच गप्पा मारत होतो ... खूप साऱ्या शाळेच्या आठवणी एकामागून एक बाहेर येत होत्या ...
आणि आमच्या सोबत त्या शिक्षिका हि ....

काही वेळाने त्यांचा निरोप घेऊन खाली येत असताना मुख्याध्यापक च office दिसलं पण तिथे जायची काय आमची हिम्मत झाली नाही .. मग तसच शाळेच्या बाहेर आलो ... आणि सोनल माझ्या डोक्यावर शाळेतल्या सारखी टपली मारत बोलली आज तुझी पाळी ...


त्या दिवशी garden मध्ये chinese वडापाव दिला होता आठवलं मला ....

मी - हो आठवलं ... शाळेचा chinese वडापाव तू garden मध्ये दिला होता ...आता शाळेची आठवण देणारा ..खाऊया ..

आमच्या दोघांची वारी निघाली chinese वडापाव कडे...तिथे तेच काका होते ..

मी - काय काका ओळ्खल का ?

काका - हो .. वडापाव देऊ न ?

मी - हो द्या

काका -( वडापाव देत ) शाळा झाली तुमचीआता काय मग ?

आम्ही दोघ - आता college ....

वडापाव घेऊन आम्ही खात खात रस्त्याने चालत होतो ...मनात आणि जिभेवर आठवणीं ची चव चाखत होतो .....



 







0 comments: