कुणी रडवाव तर कुणी हसवाव

५. कुणी रडवाव तर कुणी हसवाव

22:00 mayur 0 Comments



प्रेमी जोडप्यात भांडण काही नवीन नाही, रुसवे फुगवे, मग राग विसरून परत जवळ येण अस चालूच असत.
काल ६ महिने झाले झाले माझ्या आणि अभिलाषा च्या relationship ला, म्हणून एका हॉटेल मध्ये भेटायचं ठरवलं,
ठरल्या प्रमाणे गेलो हॉटेल मध्ये , order दिली जेवणाची, आणि गप्पा मारत होतो, अभिलाषा पण छान पंजाबी dress मध्ये होती, 
बोलता बोलता तिने अचानक मला विचारलं 

ती - "६ महिने झाले आता, तुझा विश्वास आहे माझ्यावर ?"

मी - "का काय झाल ??"

ती - "सांग तर "

मी - "हो आहे न ..६ महिने विश्वास आहे म्हणून आहोत न !!"

ती - "हो, पण माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर ...माझा विश्वास नको तोडूस, कुठे दुसरीकडे असेल तर सांग  please "

इथून मग भांडणाला तोंड फुटल, कालचा पूर्ण दिवस भांडत गेला, घरी आल्यावर पण message ने भांडणच सुरु होत, 

आज सकाळी शाळेच्या group वर message आला कि सर्वांनी garden मध्ये भेटायचं, सर्वांचा होकार पण आला, सकाळच college करून संध्याकाळी garden च्या दिशेने निघालो, रस्त्यातच सोनल भेटली मला , शाळेच्या group मधली मैत्रीण, मग तिच्यासोबत गेलो garden मध्ये गेलो, मी तीला विचारलं अरे आज सर्व जन येणार होते शाळेतले तूच आलीस बाकीचे कुठे आहेत,

सोनल - "अरे नाही येणार ते plan cancel झाला त्यांचा "

मी - "मग तू ?"

सोनल - "अरे मी इथेच जवळ राहते , आज आले असच garden मध्ये "

मी - "sorry हा तुला त्रास माझ्या मुळे, मी जातो तू कर enjoy"

सोनल - "अरे थांब , मी एकटीच आहे, कोणाला भेटायला नाही आले, तास पण शाळेतले मित्र कुठे भेटतात आज काल "

मी - "बर ठीक आहे "

मग आम्ही garden मध्ये एक छोटस तलाव आहे आणि त्याच्या भोवती बसायला जागा आहे, इथे जाऊन बसलो 

मी - "मग काय चालू आहे सध्या ?"

सोनल - "college अजून काय चालू असणार "

मी - "माझ पण"

काही वेळ असाच शांततेत गेला ..

सोनल - "काय साहेब , शांत शांत  मूड ठीक नाहीय वाट्त ?"

मी - "नाही तस काही नाही, college, परीक्षा येईल न आता त्याच "

सोनल - "प्रियासी कशी आहे तुझी ??  काय नाव तीच ....हा अभिलाषा  न ?"

मी - "हो , बरी आहे ती पण "

सोनल - "break up झाला काय ?"

मी - "नाही ग , भांडण " 

सोनल - ( गालातल्या गालात हसून ) "तरीच साहेब एवढे उदास दिसताहेत "

मी पुढे काहीही बोललो नाही.

सोनल - "५ मिनिटे थांब मी आलेच "

मी - "हो , चालेल " 

  माझ अस कधी होत नाही सहसा कि मनातल लग्गेच कोणा दुसर्याला सांगितलं , आज अचानक सांगितलं , मी माझ्यावर अचंबित झालो होतो 
 सोनल तशी हुशार मुलगी, शरीराने उंच , रेखीव , चालण्यात बोलण्यात एक ठाम पणा असायचा आजही आहे, आणि भेटल्या भेटल्या चक्क मला फक्त पाहून ओळखल-माझ काही तरी बिनसलंय , अस झाल नव्हत माझ्या बाबतीत.

सोनल - "हे घे"

मी - "काय आहे ?"

सोनल - "तुझ आवडत"

मी - (उघडून बघतो ) "अरे वाह chinese वडापाव !!!!"

शाळेत आम्ही chinese वडापाव खूप खायचो , रोज एकेकाची पाळी असायची, एक जास्त वडापाव घ्यायची मग तो सर्वात वाटून खायचा  आणि जो नाही देणार त्याची पिटाई असायची,

सोनल - "३ आहेत, १ जास्त , आज माझी पाळी "

आणि आम्ही दोघ हसू लागलो, मी तर विसरूनही गेलो होतो पण सोनलने मला आठवण करून दिली, शाळेतल्या आठवणी खरच जगावेगळ्या असतात आणि न  विसरता येणार्याही.

मी - "एक हसी कि किमत क्या तो chinese वडापाव , एक दोस्ती कि किमत क्या तो chinese वडापाव, एक मिठीसी याद कि किमत क्या तो ये chinese वडापाव "

सोनल - हसून "व्हा , साहेब मस्तच , चला आधीचा तू तरी भेटलास त्या निमित्ताने "

मी - "अस का ?"

सोनल - "शाळा संपली , नंतर खूप बदललं रे सर्व, तुझ्या भाषेत सांगायचं तर काही जण हरवले अन काही जण सापडलेत तरी हरवल्या सारखे वाटतात"

मला काळत होता तिच्या बोलण्याचा अर्थ, शाळा संपल्यावर जवळचे दूर जातात , आणि जे असतात त्यांचे स्वभाव-वागण बदलत जात, आपण आठवत राहतो पण ते आधीचे दिवस,  शाळेचे दिवस....

मी - "काय करणार , life आहे असच होत असत , कोणी सोबत असो व नसो जागाव तर लागतच "

सोनल - "हो का म्हणूनच मगाशी upset होतास, (अभिलाषा) सोबत नव्हती म्हणूनच न ? सर्वांना सोबत हवी असते "

मी शांत तिच्याकडे पाहत होतो , मला सुचल नाही तेव्हा काय बोलू , काही वेळाने तिनेच विषय बदलला आणि शाळेतल्या गप्पा सुरु झाल्या 
तासभर गप्पा मारल्या , मग निघताना "खूप छान आहेस तू बोलायला , वागायला पण असा upset राहू नकोस, चल bye bye भेटू नंतर ........."

You Might Also Like

0 comments: