भेट

३. भेट न विसरणारी ...

18:28 mayur 0 Comments







कधी आस पास तू , कधी मोकळ्या आभाळात तू 
त्रास देणाऱ्या उन्हात तू , नुकतीच आलेली वाऱ्याची झुळूक तू 
मला लागलेली प्रेमाची तहान देखील तूच 




तेव्हा काही बोलली नाही पण घरी आल्यावर message ने बोललीच "आपला स्पर्श झाला आज" 

मी - हो,  झाला पण .................



खूप लाजाळू आणि नखरेल , माझी पहिली हक्काची , प्रियसी....typical love story.. फिरायच, दंगा करायचा, भांडायचं सर्व.... एकदम कोमल नाजूक फुलासारखी ... खूपच भाऊक आणि माझ्यावर प्रेम करणारी 

गप्प गप्प असायची , जास्त काही बोलायची नाही पण कळायचं तिच्या डोळ्यात काय चाललाय ते, वरून साधी भोळी वाटायची पण आतून मनाची चल-बिचल सुरु असायची, modern कपडे नेहमी ... fashion designer व्हायचं होत तीला, समोरून आली कि जणू पाहतच रहावस वाटायचं मला आणि आजही वाटत. कधी एकांतात असलो कि माझा हात पकडायची .. कांद्यावर आपल डोक ठेवायची आणि डोळे बंद करून कित्तेक तास घालवायची 

आज गेलो होतो भेटायला , स्पर्श झाला तेच बोलत होती मगाशी , 
३ वर्षा नंतर गेलो भेटायला , काहीही बदलली नाहीय अजून आहे तशीच आहे ... 

पण आज जरा हळवी झाली होती ... बस मध्ये bye बोललो तेव्हा  घरी आल्यावर message नेही जास्त काही बोललो नाही  पण जाणवलं मलाही miss करतेय मला, ती दाखवत नाहीय , कारण तीच सोडून गेलीय ३ वर्षा पूर्वी, आज असच भेटायला बोलावलेल, मलाही बर वाटल , कोणी तरी स्वताहून अस प्रेमाने बोलावलं तर....... माझ्या मनात राग नाहीय तिच्या बद्दल ,कारण तीच दुख कळतंय मला आणि कदाचित माझ हि तीला कळत असाव. 
  
"अभिलाषा" तीच नाव 

आज भेटलो तेव्हा त्याच आधीच्या style ने माझ नाव घेतलं , आणि चेहऱ्यावर हसू , 
मी म्हंटल "आज आमची आठवण कशी ?"
काहीच बोलली नाही , फक्त पाहत होती माझ्या जवळ 
तिच्या चेहऱ्यावरच ते हसू आता... हळू हळू नाहीस होवू लागल होत आणि ती उगाचच mobile मध्ये पाहत होती 
मी mobile बाजूला करून तिचा हात हातात घेतला आणि बोल्लो - "काय झाल ?"

ती- "खूप त्रास दिला ना मी तुला, आता वाईट वाटतंय, तू आलास भेटायला thanks"

मी- ( मी माहोल जरा हलका करण्यासाठी बोललो )  एवडच ना , मला वाटल लग्न वेगेरे ठरलं कि काय तुझ ???

हसता न्हवत येत तीला , मान खाली घातली आणि माझा हात घट्ट पकडून धरला आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा येऊ लागल्या 
मी ते तस तीच रडण मूर्ख माणसासारख पाहत होतो, खूप वाटत होत जाऊन तीला सावराव , हसवाव पण तेव्हा काय झाल काय माहित 
मी तसाच तिचा हात हातात घेऊन पाहत होतो तीला, कोणी तरी आपल्या अंगातली पूर्ण शक्तीच काढून घेतलीय अस वाटू लागल,  तिनेच मग डोळे पुसले, कदाचित तीच ते दुख इतक मोठ असेल कि माझ्याने सावरल नसत गेल, खूप विचित्र क्षण होता तो, कुणी तरी आपल्या खूप जवळ आहे, पण जाणवत नाहीय ....कुणी तरी हाक मारतय पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नाहीय अस झाल होत मला.......

तिचा हात जरी माझ्या हातात असला तरी मन एका गुंतागुंतीच्या पाळण्यावर हिंदोळे घेत होत, हे एका बाजूला  आणि रडून लालबुंद झालेला तिचा चेहरा, मला अपराधी पणाची जाणीव करून देत होता.   

आपण कितीही दाखवलं आपल्याला त्रास होत नाहीय , आपल सर्व ठीक चाललाय तरी.... मनातल ते कधी तरी कस तरी बाहेर येतच ....... 

You Might Also Like

0 comments: